वाकडी प्रकरणातील दोन आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 13:15 IST2018-06-17T13:15:50+5:302018-06-17T13:15:50+5:30
दोघांना रविवारी जळगाव येथे न्यायालयात हजर केले

वाकडी प्रकरणातील दोन आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी शनिवारी अटक केलेल्या अजित कासम तडवी (२४) व शकूर सरदार तडवी (२९) या दोघ आरोपींना तीनव दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वाकडी येथे विहीरीत पोहण्याच्या कारणावरुन संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली होती. रविवारी घडलेल्या या आमानुष घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता फुटली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी आणखी दोघांना अटक करण्यात आले होते. या दोघांना रविवारी जळगाव येथे न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.