शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

चोपड्यातील विवेकानंद शाळेत अवतरली थ्री डी सूर्यमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:19 IST

विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सूर्यमाला व अंतराळातील अनोखे दृश्य थेट स्वत:च्या हातात हाताळण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कारनवीन तंत्रज्ञानाचे आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न

चोपडा, जि.जळगाव : येथील विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सूर्यमाला व अंतराळातील अनोखे दृश्य थेट स्वत:च्या हातात हाताळण्याची संधी मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाची ही किमया, त्यातून मिळणारा अमूल्य असा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला.विद्यालयात विविध उपक्रम राबवणारे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांनी मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक्सफ्लोरर फॉर मर्ज क्यूब’ या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून विद्यार्थ्यांना भूगोल, विज्ञान, कला इत्यादी विषयाचे ज्ञान दिले. यात खास करून प्रत्येक ग्रह आणि त्याच्या उपग्रहांची माहिती, विविध मानवी अवयव, विविध संग्रहालयातील मूर्तींची माहिती थ्री डी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांना ती स्वत: हाताळण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.मुलांना शाळेत आनंददायी शिक्षणाबरोबरच नावीण्यपूर्ण पद्धतीने शिक्षण मिळावे, त्यांच्यात कुतूहल, जिज्ञासा जागी व्हावी,मुलांमध्ये शिक्षणातील गोडी वाढून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व स्मार्टफोनचा योग्य वापर करून शिक्षण घ्यावे या उद्देशाने संध्या ए.टी.एम. अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ग्रुप अंतर्गत नावीण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विवेकानंद विद्यालय चोपडा येथे शाळेत सूर्यमाला, मानवी अवयव, संग्रहालयातील मूर्ती कशा बघाव्या याबाबत माहिती देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याप्रसंगी कलाशिक्षक राकेश विसपुते म्हणाले की, मोबाईलमध्ये ‘एक्सप्लोरर फॉर्म क्यू’ हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावे. त्याची मार्कर इमेज असणारी मर्ज क्युब डाऊनलोड करून घ्यावी. मोबाईलमधील अ‍ॅप उघडून मर्ज क्युबवर स्कॅन केल्यास थ्रीडी स्वरूपात सूर्यमाला, मानवी अवयव, संग्रहालयातील मूर्ती दिसतात. दिसणाºया भागाला स्पर्श केल्यास त्याची माहिती प्रक्षेपित होते व त्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने समजतात, दीर्घकाळ लक्षात राहतात व मुलांचा शिक्षणातील शिकण्याचा आनंद वाढतो. हा उपक्रम राबवण्यात विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी, जावेद तडवी, सरला शिंदे, नूतन चौधरींसह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. या नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अ‍ॅड. रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, तसेच सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन व कौतुक केले.

टॅग्स :Educationशिक्षणChopdaचोपडा