शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

भुसावळ खून प्रकरणी काही तासातच खुनातील तिन्ही संशयित आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 5:16 PM

भुसावळ खून प्रकरणी काही तासातच खुनातील तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देकिरकोळ वादातून खुनाची घडली घटना डीवायएसपी वाघचौरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

भुसावळ : शहरातील लिंम्पस क्लब परिसरात १३  रोजी सकाळी सातला ३४ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्याची धक्कादायक घटनेची माहिती समोर आल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मयत संदीप गायकवाड यांची पार्श्वभूमी पडताळणी केल्यानंतर व सर्व बाजूंनी बारकाईने तपासणी केल्यानंतर प्रथम दर्शनी हा खून शुल्लक कारणावरून शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी शहर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत  दिली. या घटनेत आरोपींनी संदीप एकनाथ गायकवाड (वय ३४,, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या इसमाचा खून केल्याचे उघड झाले होते. पत्रकार परिषदेला शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहायक निरीक्षक संदीप दुणगहू उपस्थित होते.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अर्चित चांडक, शहरचे सहायक निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, हवालदार संजय सोनवणे, हवालदार मो.वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी हा खुनाचा गुन्हा समोर आणला. तिन्ही आरोपींचे वय वर्ष १९संदीप एकनाथ गायकवाड या इसमाच्या खून प्रकरणी  भुसावळच्या तिन्ही आरोपींचे वय अवघे १९ वर्षे इतके आहे. अजय अशोक पाठक (१९), ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर, भुसावळ, पंकज संजय तायडे (१९), राहुल नगर, भुसावळ आणि आशिष श्रीराम जाधव (१९), श्रीराम नगर, भुसावळ या संशयितांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मयत व अटकेतील आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. केवळ किरकोळ वादातून त्यांनी हा खून केल्याची बाब पुढे आली आहे, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे   यांनी सांगितले.अल्पवयीन मुलांची गुन्हेगारीकडे वाटचाल हे चिंतेची बाबशहरात एकेकाळी नामचिन रथी-महारथी असे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले डॉन असायचे. मात्र सद्य:स्थितीत अवघ्या अठरा, एकोणीस, वीस, पंचवीस वर्षे वयातील तरुण गुन्हेगारीकडे ओढले जात आहे हे शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वीसुद्धा शहरातील गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, शहरात गेल्या काही वर्षांमध्ये खून, घरफोडी, तलवारी काढणे,  गावठी कट्टा बाळगणे, धूम स्टाईल  चैन पळवणे  या घटनांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अर्थातच पोलीस प्रशासन घटनेच्या काही तासातच आरोपींना ताब्यात घेतात ही जमेची बाब दिसून येते. तसेच मध्यंतरी शहरात सफेद कपडे घालून समाजात वावरणारे मोठे भंगार चोर यांच्या गोडाऊनवरसुद्धा पोलीस प्रशासनाने छापे मारले होते. यानंतर या गोडाऊनमध्ये सापडलेल्या भंगाराची नोंद ठेवण्याचे  निर्देश भंगार गोडाऊनधारकांना करण्यात आले होते. मात्र अद्याप किती गोडाऊनमधून किती भंगाराचा माल  आला याची माहिती समोर आलेले नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ