फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By विजय.सैतवाल | Updated: February 13, 2024 18:46 IST2024-02-13T18:45:53+5:302024-02-13T18:46:47+5:30

आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली

Thief stealing materials from farm house in police net | फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

फार्म हाऊस मधून साहित्य लांबवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशिन व इतर साहित्य चोरून नेणाऱ्या आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण, शिरसोली) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तालुक्यातील शिरसोली गावाजवळील बुधली धरण परिसरात असलेल्या विजयकुमार जयसिंग कोसोदे यांच्या फार्म हाऊसमधून ९ फेब्रुवारी रोजी दोन हजार रुपये किंमतीचे ब्रेकर मशिन, तीन हजार रुपये किमतीचे कटर मशिन, १२०० रुपये किंमतीची हँडकटर मशिन, १२०० रुपये किंमतीचे वायरचे दोन बॉक्स चोरुन नेले होते. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण, शिरसोली) याने ही चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यावरून सहाय्यक फौजदार अधिकार पाटील, पोहेकॉ समाधान टाकळे, जितेंद्र राठोड, पोकॉ शुध्दोधन ढवळे, मुकेश पाटील, प्रदीप ठाकूर, ललित नारखेडे यांनी आबा भिल याला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Web Title: Thief stealing materials from farm house in police net