जळगावात दोघांना चोरी करताना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:30 IST2018-03-28T20:30:39+5:302018-03-28T20:30:39+5:30

चिंचोली शिवारातील केटामाईन निर्मितीच्या बंद पडलेल्या कंपनीत लोखंडी पाईपाची चोरी करताना मोहन पांडूरंग अंबुरे (वय ३८ रा.हनुमान नगर, जळगाव) व प्रकाश महेंद्रलाल शर्मा (वय ३२ रा.आयोध्या नगर, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.

They caught fire while stealing the two in Jalgaon | जळगावात दोघांना चोरी करताना रंगेहाथ पकडले

जळगावात दोघांना चोरी करताना रंगेहाथ पकडले

ठळक मुद्देचिंचोली शिवारातील बंद पडलेल्या कंपनीत करीत होते चोरीएमआयडीसी पोलिसांनी केली दोघांना अटकदोघा संशयितांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२८ चिंचोली शिवारातील केटामाईन निर्मितीच्या बंद पडलेल्या कंपनीत लोखंडी पाईपाची चोरी करताना मोहन पांडूरंग अंबुरे (वय ३८ रा.हनुमान नगर, जळगाव) व प्रकाश महेंद्रलाल शर्मा (वय ३२ रा.आयोध्या नगर, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.
चिंचोली शिवारातील बंद पडलेल्या कंपनीत चोरी होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांना मिळाली होती. त्यानुसार अढाव यांनी उपनिरीक्षक सोळंकी, सहायक फौजदार अतुल वंजारी व शरद भालेराव यांचे पथक तातडीने रवाना केले असता मोहन व प्रकाश दहा हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप घेऊन जात असताना आढळून आले. दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: They caught fire while stealing the two in Jalgaon