शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

indpendece day पहिल्या ध्वजारोहणास प्रचंड उत्साहाचे वातावरण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:18 IST

मोतीलाल गुजराथी : चोपडा शहरात होता मोठा उत्साह

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : महात्मा गांधींनी स्वतंत्र भारत होण्यासाठी चले जाव चळवळ, भारत छोडो आंदोलन, मिठाचा सत्याग्रह यासह असंख्य आंदोलने पुकारली. या आंदोलनाचा प्रभाव आमच्याही मनावर झाला आणि आम्ही शालेय शिक्षण घेत असतानाच महात्मा गांधीजींच्या चळवळीत सहभागी झालो, अशी भावना स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल कन्हैयालाल गुजराथी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य दिनाचा प्रथम झेंडावंदन कार्यक्रम चोपडा शहरात अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला होता व तत्कालीन मामलेदार यांच्या हस्ते तहसील कार्यालय आवारात प्रथम झेंडावंदन झाल्याचेही त्यांनी सांगितले.चळवळीविषयी सांगताना ते म्हणाले, महात्माजींनी सत्याग्रह पुकारला त्यावेळी आम्ही पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होतो. वर्गातच दप्तर सोडून आम्ही सत्याग्रहात सहभागी झालो. तेव्हाच्या मामलेदारांनी आम्हास समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तुम्ही लहान आहात, तुम्ही येथून निघून जा, तुम्हाला आम्ही सोडून देतो, तुमच्या वडिलांची इस्टेट जमा होईल, असाही आम्हाला त्या काळात धाक दाखविण्यात येत होता. मात्र आम्ही ठामपणे सांगितले की, जर आम्हाला स्वातंत्र्य मिळेल तर इस्टेट जमा होण्याचा विषयच येत नाही. तेव्हा प्रचंड उत्साह असल्याने सर्व शाळा आम्ही ओस पाडल्या. दररोज सकाळी मिरवणूक काढायचो आणि जनजागृती करायचो.मामलेदार आणि फौजदाराने पकडून हे ऐकणार नाही म्हणून त्या काळात चार महिने धुळे येथील जेलमध्ये ठेवले होते. तसेच त्यावेळी चोपड्यात स्वातंत्र्य मिळणार यानिमित्ताने मगनलाल नगीनदास गुजराथी आणि गोवर्धनदास भिकारीदास गुजराथी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण केली होती.त्यावेळी माझे वडील कन्हैयालाल गुजराथी यांना जळगाव येथील कलेक्टरने विचारले की, गावात परिस्थिती कशी आहे? त्याच काळात गोवर्धनदास गुजराथी यांना उचलण्यात येणार होते. मात्र माझ्या वडिलांनी ठणकावून सांगितले की, त्यांना जर तुम्ही उचलले तर शांतता बिघडू शकते, ते आहेत म्हणूनच शांतता आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसChopdaचोपडा