जळगावात ब्राह्मण समाजातील निष्ठावंतांना डावलल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:04 IST2018-07-11T21:03:04+5:302018-07-11T21:04:55+5:30
मनपा निवडणुकीत भाजपातील ब्राह्मण समाजातील प्रवीण कुलकर्णी व नीलेश कुलकर्णी या निष्ठावंत उमेदवारांना समाजातील काही मंडळींनी डावलल्याने ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजीचा सूर बुधवारी समाजमाध्यमांवर उमटला.

जळगावात ब्राह्मण समाजातील निष्ठावंतांना डावलल्याने संताप
जळगाव- मनपा निवडणुकीत भाजपातील ब्राह्मण समाजातील प्रवीण कुलकर्णी व नीलेश कुलकर्णी या निष्ठावंत उमेदवारांना समाजातील काही मंडळींनी डावलल्याने ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजीचा सूर बुधवारी समाजमाध्यमांवर उमटला. समाजश्रेष्ठींनी चुकीचा निर्णय घेतल्याचे म्हणत काही ब्राह्मण समाज बांधवांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
मनपा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. त्यात सोशल मीडियावर अनेक समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा सुरू आहे. प्रभाग क्र.१३ साठी भाजपाचे २४ वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्त्ते प्रवीण कुलकर्णी यांच्यासह नीलेश कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारून समाजश्रेष्ठींनी राजेश नाईक यांचे उमेदवारीसाठी अचानक नाव पुढे केले. धनशक्तीपुढे सक्षम उमेदवारांचा बळी गेल्याचा आरोप भूपेश कुलकर्णी यांनी केला़ अनेकांनी या गोष्टीचे समर्थन केल्याने या मुद्यावर समाज बांधवांकडून चांगलीच चर्चा रंगली.
दिवसभर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू होता़ तर दुसरीकडे राजेश नाईकांना विरोध होतच त्यांना देखील उमेदवारी न देता त्या प्रभागातून ऐनवेळी दुसऱ्यालाच उमेदवारी दिली गेल्याचे समजते. एकंदरीत समाजाकडून एकाही सक्षम उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर उमेदवार निवडीची रनणीती आखणाºया समाजश्रेष्ठींसह नाईक यांच्याविरूध्द नाराजी व्यक्त करण्यात आली़ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देखील त्या गु्रपवर चर्चा सुरूच होती़