तरुणाला मारहाण आली अंगलट; पाचोऱ्यात फौजदाराविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 22:58 IST2023-11-30T22:58:47+5:302023-11-30T22:58:57+5:30
भांडण सोडविण्यास आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राह्मणे यांनाही मारहाण करण्यात आली.

तरुणाला मारहाण आली अंगलट; पाचोऱ्यात फौजदाराविरुद्ध गुन्हा
- श्यामकांत सराफ
पाचोरा (जि.जळगाव) : संशयाच्या कारणावरून एका तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ व २४ नोहेंबर रोजी कॉलेज ग्राउंड व सिंधी कॉलनी परिसरात उल्हासनगर येथील प्रथम संदीप गायकवाड (१९) या तरुणास संशयावरून वल्टे यांनी शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेले प्रथमचे मामा संदीप ब्राह्मणे यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात पीएसआय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहेत.