तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 15:30 IST2022-06-09T13:51:03+5:302022-06-09T15:30:40+5:30

अफसर अजित नहाल (तडवी) असे या मृत बालकाचे नाव आहे.

The unfortunate death of a child due to the shock of a broken power line; Incident in Jalgaon | तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

खिरोदा जि.जळगाव: तुटलेल्या वीज तारांचा धक्का लागून तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना  खिरोदा ता.यावल येथे नवीन बेघर वस्तीत गुरुवारी सकाळी ७ वाजता घडली. 

अफसर अजित नहाल (तडवी) असे या मृत बालकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी खिरोदा परिसरात वादळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या. अफसर हा गुरुवारी सकाळी  बाहेर जात होता. त्याचवेळी तुटलेल्या तारांचा त्याच्या पायाला स्पर्श झाला.  त्या तारा हाताने बाजूला करीत असताना  हात तारांना चिकटून बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Web Title: The unfortunate death of a child due to the shock of a broken power line; Incident in Jalgaon