आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 04:24 IST2024-05-03T04:23:34+5:302024-05-03T04:24:04+5:30

रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.  आमोदा गावातील पुरातन श्री राम मंदिर असून हे पूर्ण मंदिर लाकडी आहे.

The temple in Amoda caught fire; the temple and the district bank branch were also destroyed by fire | आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी

आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी

फैजपूर (जि.जळगाव) : आमोदा ता. यावल येथील पुरातन  राम मंदिराला गुरुवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. यात संपूर्ण मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. याशिवाय मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेली जिल्हा बँक शाखाही आगीत खाक झाली. 

 रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.  आमोदा गावातील पुरातन श्री राम मंदिर असून हे पूर्ण मंदिर लाकडी आहे. तसेच या मंदिराच्या वरच्या मजल्यावर जिल्हा बँक शाखा आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या मंदिराला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. सावदा व फैजपूर येथील अग्निशमन बंब बोलवण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती, या आगीत लाकडी श्रीराम मंदिर तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Web Title: The temple in Amoda caught fire; the temple and the district bank branch were also destroyed by fire

टॅग्स :fireआग