लाल परीतून शैक्षणिक सहलींचा यंदा आकडा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 23:39 IST2024-01-04T23:38:12+5:302024-01-04T23:39:42+5:30
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची माहिती व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे.

लाल परीतून शैक्षणिक सहलींचा यंदा आकडा वाढणार
जळगाव : हिवाळा आला की शैक्षणिक सहलींना सुरवात होते. शैक्षणिक संस्थाकडून खासगी ट्रॅव्हल तसेच एसटीला पसंती दिली जाते. त्यात एसटी महामंडळ ५० टक्के तिकीट दरात सूट देत असल्याने यावर्षी सहलींचे प्रमाण वाढणार आहे. डिसेंबर महिन्यात जळगाव विभागातील विविध आगारांतून सुमारे ५५ बसमधून विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला आहे. तसेच, विभागीय कार्यालयाकडे आगामी काळात सहलीसाठी बस बुक करण्याचे नियोजन जळगाव विभागातील आगारात करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची माहिती व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे. यामुळे शाळांना एसटीच्या एकूण तिकीट दरात प्रतिकिलोमीटर ५५ रुपयांऐवजी २६ रुपयेच मोजावे लागतात. दरम्यान, उर्वरित ५० टक्के तिकिटाचा महसूल राज्य शासनामार्फत एसटीकडे जमा होतो. त्यामुळे या सवलतीचा जिल्ह्यातील शाळांना फायदा घेता येणार आहे.
मागील वर्षीपेक्षा संख्या वाढणार...
२०२२-२३ मध्ये विभागातील अकरा आगाराच्या बस सहलीसाठी सोडण्याचा निर्णय जळगाव विभागीय कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा जास्त बस सहलीसाठी धावणार असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.