गुलाबरावांविरोधातील खटला खडसेंकडून मागे, गैरसमजातून प्रकार झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:53 IST2023-06-28T09:52:58+5:302023-06-28T09:53:15+5:30

Jalgaon: राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे.

The case against Gulab Rao was withdrawn by Khadse, claiming that it was a misunderstanding | गुलाबरावांविरोधातील खटला खडसेंकडून मागे, गैरसमजातून प्रकार झाल्याचा दावा

गुलाबरावांविरोधातील खटला खडसेंकडून मागे, गैरसमजातून प्रकार झाल्याचा दावा

जळगाव  - राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. मंगळवारी जिल्हा न्यायालयात दोन्ही नेत्यांनी याप्रकरणी तडजोड करण्याचा निर्णय घेतला. 
दोघांच्या गैरसमजुतीतून हा प्रकार झाला होता, असे न्यायालयाने दोन्ही नेत्यांकडून लेखी घेतले आहे.  खडसेंनी हा दावा मागे घेतल्याने गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सन २०१६ मध्ये खडसे हे युतीच्या काळात मंत्री असताना, पाटील यांनी एका सभेत खडसे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावले होते. 

मंगळवारी याप्रकरणी कामकाज होणार होते. त्याचवेळी गुलाबराव पाटील यांनी हा खटला मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यामुळेच त्यांच्या विनंतीनुसार आपण हा खटला मागे घेतला आहे. भविष्यात कोणत्याही नेत्यावर आरोप करताना पुराव्यानिशी आरोप केले गेले पाहिजेत. 
- एकनाथ खडसे
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस 

आम्हा दोघांच्या समजुतीने हा खटला मागे घेण्यात आला आहे. गैरसमजातून हा वाद झाला होता. याबाबतचे आमचे लेखी 
म्हणणे आम्ही न्यायालयात सादर केले आहे. 
- गुलाबराव पाटील, 
पालकमंत्री

Web Title: The case against Gulab Rao was withdrawn by Khadse, claiming that it was a misunderstanding