शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:16 IST

रावेर तहसील कार्यालय ‘वार्‍यावर’

रावेर : तहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार हे कोरोना बाधित झाल्याने त्यांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. निवडणूक नायब तहसीलदार देशमुख व संगांनियो नायब तहसीलदार मनोज खारे हे सुध्दा वैद्यकीय रजेवर असल्याने तहसील कार्यालय अव्वल कारकूनांच्या हवाली करण्यात आले आहे. यामुळे तहसील कार्यालय वार्‍यावर सुटल्याची आजची बिकट परिस्थिती होती. तथापि प्रभारी तहसीलदार म्हणून संजय तायडे यांची नियुक्ती झाली आहे. ऐनपूर ग्रा. पं. सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार व प्रचारात सहभागी झालेल्या दोन कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया आटोपते न आटोपते तोच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कातील घरमालक व निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार तथा त्यांचा मुलगा असे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, निवडणूक नायब तहसीलदार कविता देशमुख व संगांनियो समिती मनोज खारे हे सुद्धा वैद्यकीय रजेवर असल्याने रावेर तहसील कार्यालय आज अव्वल कारकूनांच्या हवाली करण्यात आल्याने वार्‍यावर सुटल्याची विदारक परिस्थिती होती. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण व ग्रा पं सरपंच आरक्षण सोहळा डोळ्यासमोर असताना तहसील कार्यालयाला वाली नसल्याने जनसामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तत्संबंधी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांचेशी संपर्क साधला असता,जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रभारी तहसीलदार म्हणून लवकरचं नियुक्ती होणार असल्याची पुष्टी जोडली आहे.~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~रावेर तालुक्यात आठवडेभरात ३५ कोरोना बाधित~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~रावेर शहरातील पाच रूग्णांसह तालुक्यात ३५ रूग्ण आठवडेभरात कोरोना बाधित झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी दिली. किंबहुना, नवीन तरतुदीनुसार मात्र आता गृहविलगीकरण प्रक्रिया फक्त आठवडय़ावर आली असल्याची पुष्टीही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी जोडलीसंजय तायडे प्रभारी तहसीलदारजिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार सी. जे. पवार यांच्या वैद्यकीय रजा कालावधीत ५ फेब्रुवारी पर्यंत भुसावळ निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी रावेर तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळावा असे आदेश निर्गमित केले आहेत.