वाडे येथे तगतरावाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:00 IST2018-10-28T00:57:00+5:302018-10-28T01:00:05+5:30
भडगाव तालुक्यातील वाडे येथे मनुमाता यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

वाडे येथे तगतरावाची मिरवणूक
भडगाव : तालुक्यातील वाडे येथे यावर्षीही मनुमाता यात्रोत्सवाचे आयोजन २६ आॅक्टोबर रोजी करण्यात आले होते. या निमित्त वाजत गाजत तगतराव मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यात्रोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून आयोजन पंङीत कोळी यांनी केले. मनुमातेचे मंदीर वाडे येथे गिरणा नदीच्या काठावर आहे. भाविक नेहमी दर्शनासाठी मंदीरावर येत असतात. यात्रोत्सवानिमित्त मंदीरावर रोषणाईसह आकर्षक सजावट करण्यात आली होती. या दिवशी सकाळी मंदीरावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा मोठया संख्येने लाभ घेतला.
सायंकाळी ५ वाजता तगतरावाची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. या वर्षी तगतरावास बैलजोडी जुंपण्याचा मान येथील गोकुळ परदेशी यांना देण्यात आला तर तगतराव हाकण्याचा मान भागवत पाटील यांना देण्यात आला. रात्री ९ वाजता मंदीराजवळील गणेश सोनार यांच्या शेतात बंङूनाना धुळेकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम पार पङला. श्रोत्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. ग्रामस्थांनी यशस्वीतेसाठी विशेष परीश्रम घेतले.