पारोळ्यात ट्रकच्या धडकेत शिक्षक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:40 IST2018-09-27T22:39:16+5:302018-09-27T22:40:48+5:30
आशिया महामार्ग ४६ वर किसान महाविद्यालया समोर गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता शिक्षक अनिल वाघ हे कॉटेज हॉस्पिटलकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

पारोळ्यात ट्रकच्या धडकेत शिक्षक गंभीर जखमी
पारोळा : आशिया महामार्ग ४६ वर किसान महाविद्यालया समोर गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता शिक्षक अनिल वाघ हे कॉटेज हॉस्पिटलकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
गुरुवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता आपली दुचाकी एमएच १९ बीआर ९२१५ ने अनिल वाघ हे कॉटेज हॉस्पिटल कडे जात होते. यावेळी समोरून भर धाव वेगाने येणारा कंटेनर डब्ल्यू बी ७२०६ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात लोणी हायस्कूलचे उपशिक्षक अनिल वाघ यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पारोचे, डॉ राहुल लुनावत, डॉ धनंजय पाटील यांनी प्राथमिक उपचार केला त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.