राज प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 16:47 IST2020-02-01T16:47:35+5:302020-02-01T16:47:52+5:30

जळगाव - मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात शनिवारी शिक्षक-पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. ही सभा जयश्री महाजन यांच्या ...

 Teacher-Parents Meeting at Raj Primary School | राज प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात

राज प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात

जळगाव- मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात शनिवारी शिक्षक-पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
ही सभा जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारीत विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी नवीन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाबाबतचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या यावर जयश्री महाजन यांनी मार्गदर्शन केले़ तर त्यांनी पालकांच्या समस्याही जाणून घेतल्या. तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यांनी विविध उपक्रमांची माहिती पालकांनी दिली. त्याचबरोबर पालकांच्या शंकांचे निरसन सुध्दा केले़ सूत्रसंचालन एस.ए ख़डारे यांनी केले तर आभार के.डी.ब-हाटे यांनी मानले.

Web Title:  Teacher-Parents Meeting at Raj Primary School