पहूर येथे घरफोडी नंतर चोरट्यांनी फोडले चहाचे दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:32 IST2018-09-15T12:31:33+5:302018-09-15T12:32:28+5:30
बारा हजार लंपास

पहूर येथे घरफोडी नंतर चोरट्यांनी फोडले चहाचे दुकान
पहूर, जि. जळगाव : हिवरखेडा दिगर येथील धाडसी घरफोडीला तीन दिवस उलटत नाही तोच पहूर येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेले चहाचे दुकान फोडून चोरट्यांनी बारा हजार रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. तर अन्य एक किराणा दुकान फोडण्याचाही प्रयत्न या चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे.
बसस्थानक परीसराच्या जवळ सप्तशृंगी टी हाऊस दुकान आहे. दुकानात गणपती मंडळांना देणगी देण्यासाठी व दुकानातील दान पेटीत असलेल्या पैशांसह बाराहजार रुपये रोख होते. याठिकाणी नेहमी वर्दळ असते. चोरट्यांंनी शुक्रवारी मध्यरात्री बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानात असलेले रोख बारा हजार घेऊन पोबारा केला आहे. सलूनच्या दुकान मालकाने चहाचे दुकान मालक राजेंद्र पिंताबर कलाल यांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल केली आहे.