आमदार बेलफूल वाहण्याच्याच कामाचे... राष्ट्रवादीचे जळगावात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:28 IST2020-01-30T13:28:29+5:302020-01-30T13:28:43+5:30
अधिकारी ऐकत नसल्याच्या आमदारांच्या वक्तव्यावर उमटताहेत प्रतिक्रिया

आमदार बेलफूल वाहण्याच्याच कामाचे... राष्ट्रवादीचे जळगावात आंदोलन
जळगाव : अधिकारी माझे ऐकत नाही या आमदार सुरेश भोळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी काव्यरत्नावली चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार बेलफूल वाहण्याच्याच कामाचे अशा घोषणा देण्यात आल्या.
अमृतअंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आता रस्त्यांवर उतरून आपला संताप व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले जात असून, नागरिक आता आमदारकीचा राजीनामा मागायला लागले आहेत. मनपातील अधिकाऱ्यांनीच माझी आमदारकी संपविण्यासाठी सुपारी घेतली आहे, असा धक्कादायक आरोप आमदार सुरेश भोळे बुधवारी एका बैठकीत केला होता. त्या नंतर हे आंदोलन करण्यात आले.