पावसाची छाया अन शेती पिकांवर नुकसानीची तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 16:38 IST2019-10-19T16:37:13+5:302019-10-19T16:38:46+5:30
दि.१८ रोजी सायंकाळपासून अद्यापही पावसाच्या रिपरिपमुळे खरीप हंगामातील पीक हंगाम कापणी, काढणी वेळीच भडगाव तालुक्यात मोठे संकट शेतकºयांंसमोर आले आहे.

पावसाची छाया अन शेती पिकांवर नुकसानीची तलवार
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : दि.१८ रोजी सायंकाळपासून अद्यापही पावसाच्या रिपरिपमुळे खरीप हंगामातील पीक हंगाम कापणी, काढणी वेळीच भडगाव तालुक्यात मोठे संकट शेतकºयांंसमोर आले आहे. विधानसभा निवडणुकीचा बोलबाला चालू असून, मजूरटंचाईनेही शेती कामांना ब्रेक लागत आहे. शेती पिके कापणी, काढणीची कामे सुरू आहेत. पावसाची छाया पसरली आहे. शेती पिकांवर नुकसानीची टांगती तलवार आहे. त्यामुळे शेतकºयांची शेती कामांसाठी मोठी धावपळ उडाली आहे.
तालुक्यात खरीप हंगामाची पीक पेरणी जवळपास ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आल्या होत्या. दमदार पावसाने शेती पिकेही जोमदार वाढत चांगल्या उत्पन्नाच्या वाटेवर होती. सततच्या जादा पारसाने णगदी बागायती कापूस पिकाच्या परिपक्व झालेल्या कैºया सडल्या व फुटलेल्या कापूस बोंडाचेही नुकसान झाले होते. एकंदरीत बागायती कापूस पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले होते.
सध्या शेती हंगाम काढणीचा धुमधडाका सुरू आहे. त्यात दि.१८ रोजी सायंकाळपासुन अचानक पाऊसाने रिपरीपचा मारा सुरु केला आहे.दि. १९ रोजीही सकाळपासून सायंकाळपर्यंत ब्रेक के बाद पावसाची रिपरिप सुरुच होती. दिवसभर पावसाचे वातावरण होते. सध्या शेती हंगाम कापणी, काढणीची कामे सुरु आहेत. ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांची कापणी करुन जमिनीवर कणसे, चारा पङला आहे. कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. त्यातच विधानसभा निवडणुका प्रचारात गावोगावी मजुरांना रोजगार मिळत असल्याने शेती कामांकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजुरीचे दरही गगनाला भिडले आहेत. या अवकाळी पावसाने शेतकºयांंच्या अवकळा होताना दिसत आहेत. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी आदी पिकांचे व चाºयाचे नुकसान होत आहे. शेतकरी व मजूर शेती पिकांची कामे धावपळीने आवरण्यात व्यस्त आहेत. असाच पाऊस चालला तर हाता तोंडात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांवरचा खर्चही काढणे मुश्कील आहे. आता पावसाने विश्रांती घ्यावा, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.