स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात रंगणार युवास्पंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:07 IST2019-12-02T16:06:54+5:302019-12-02T16:07:06+5:30

जळगाव - मू़जे़ महाविद्यालयाच्या आवारातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात १३ व १४ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन युवास्पंदन कार्यक्रम रंगणार ...

Swami Vivekananda YouthSpandan will be attending junior college | स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात रंगणार युवास्पंदन

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात रंगणार युवास्पंदन

जळगाव- मू़जे़ महाविद्यालयाच्या आवारातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात १३ व १४ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन युवास्पंदन कार्यक्रम रंगणार आहे.

युवास्पदंन स्नेहसंमेलनानिमित्त १०, ११, १२ डिसेंबर रोजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबर रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होईल़ यादिवशी फूड फेस्टिवल खाना-खजाना, हास्यप्रधान खेळ, उत्स्फूर्त भाषण व काव्यवाचन स्पर्धा, विविध छंद स्पर्धा, ललित कला प्रदर्शन, मेहंदी स्पर्धा, गरबा राऊंड आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

गीत गायन, नृत्य स्पर्धेने येणार रंगत
१४ डिसेंबर रोजी अंताक्षरी स्पर्धा, गीत गायन व वादन स्पर्धा, नृत्य स्पर्धा होणार असून या स्पर्धांनी युवास्पंदनमध्ये रंगत येणार आहे़ तसेच पारितोषिक वितरण समारंभ होईल़तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महाविद्यालय समन्वयक प्रा.एस.ओ. उभाळे, उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे, सर्व समन्वयक व स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.संतम्मा वर्गीस यांनी केले आहे.

Web Title: Swami Vivekananda YouthSpandan will be attending junior college