सरकारी वकील महिलेचा संशयास्पद मृत्यू, डॉक्टर पतीे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 18:23 IST2019-01-14T18:22:37+5:302019-01-14T18:23:21+5:30
जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील असलेल्या राखी भरत पाटील उर्फ विद्या राजपूत ( वय ३६ वर्ष) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(14 जानेवारी) सकाळी उघडकीस आली.

सरकारी वकील महिलेचा संशयास्पद मृत्यू, डॉक्टर पतीे ताब्यात
जळगाव : जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील असलेल्या राखी भरत पाटील उर्फ विद्या राजपूत ( वय ३६ वर्ष) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(14 जानेवारी) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पती डॉक्टर भरत लालसिंग पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या राजपूत यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना भुसावळ येथील दवाखान्यात आणत असल्याचे डॉ. भरत पाटील यांनी माहेरच्या लोकांना रात्री दीड वाजता फोन करुन सांगितले. यानंतर तातडीनं विद्या यांच्या माहेरची काही मंडळी भुसावळमध्ये दाखल झाली. पण भुसावळमधील दवाखान्यात त्यांना विद्या दाखल असल्याचे आढळले नाही. नंतर वरणगाव येथे मृतदेह नेण्यात आल्याचे डॉ. राजपूत यांनी नातेवाईकांना सांगितले. पण शेवटी मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्याची माहेरच्या लोकांनी तयारी केली असता पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी त्यास विरोध केला. त्यावरुन जिल्हा रुग्णालयात वादही झाला.