बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 08:14 PM2018-11-30T20:14:46+5:302018-11-30T20:15:52+5:30

करंजी पाचदेवळी गावातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर विवाहितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

Suspicious death of marriage in Karanji Pachadevli in Bodwad taluka | बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देविवाहितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा गळा आवळून केला खूनतूर्त वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

वरणगाव, जि.जळगाव : बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी गावातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर विवाहितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
बोदवड येथील माहेर असलेली प्रियंका (वय २०) हिचा विवाह करंजी पाचदेवळी येथील गोपाळ शालिग्राम पाटील या तरुणाशी पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. ती गर्भवती असल्याची माहिती प्रियंकाच्या आईने दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियकाने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेत पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. याबाबत पोलीस पाटील यांनी खबर दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे यांनी भेट देवून पाहणी केली. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सरिता कोडापे करीत आहे.
दरम्यान, मयत प्रियंका हिच्या आईने जावाई गोपाळ याला कॅमेरा विकत घेण्यासाठी १० हजार रुपये दिले नाही म्हणूनच त्याने माझ्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप शुक्रवारी सकाळी वरणगाव पोलीस ठाण्यात येवून केला. तसेच अनेक प्रश्न उपस्थित केल्याने नेमका प्रियंकाचा खून झाला की आत्महत्या केली, याबाबत पोलीसही साशंक झाल्याने प्रियकाचा पती गोपाळ पाटील व शालिग्राम दयाराम पाटील या पिता-पुत्रास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी देवर्षी घोषाल यांनी केले. दुपारी बोदवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे यांना विचारणा केली असता, तो खून नसून, आत्महत्या आहे. परंतु आरोपीने पैशाची मागणी केली होती. तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीवर भा.दं.वि. कलम ४९८ व ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल.

Web Title: Suspicious death of marriage in Karanji Pachadevli in Bodwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.