मुख्याध्यापकासह तिघांवर निलंबनाचा उतारा!

By Admin | Updated: July 1, 2014 14:37 IST2014-07-01T14:37:45+5:302014-07-01T14:37:45+5:30

पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या खेडगाव (नंदीचे) येथील शाळेत रंगलेल्या ओल्या पार्टी प्रकरणात मुख्याध्यापक व दोन शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे.

Suspension surrender on the three teachers with headmaster! | मुख्याध्यापकासह तिघांवर निलंबनाचा उतारा!

मुख्याध्यापकासह तिघांवर निलंबनाचा उतारा!

>जळगाव/पाचोरा : पाचोरा तालुका शिक्षण संस्थेच्या खेडगाव (नंदीचे) येथील शाळेत रंगलेल्या ओल्या पार्टी प्रकरणात मुख्याध्यापक व दोन शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे, तर १0 शिक्षकांसह कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. २७ रोजी रात्री शिक्षक व कर्मचार्‍यांची चक्क शाळेतच दारू व मटण पार्टी रंगली होती. यानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापक एम.एफ. चव्हाण, शिपाई डी.बी. अहिरराव व जी.व्ही. पाटील यांना निलंबित करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती पीटीसी चेअरमन संजय वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली. आमदार दिलीप वाघ, खेडगाव शाळेचे चेअरमन विजय संघवी उपस्थित होते. (वार्ताहर)
 
सर, तुम्हीसुद्धा..?
■ शिक्षक टी.ई.पाटील, यू.एस. पाटील, एस.एन.कोळी, एम.वाय.सावळे, डी.बी.राजपूत, एस.सी.भदाणे, पी.आर.महाजन, पी.सी.शिंदे, के.जी.पाटील यांना तसेच कर्मचारी एस.जे. सोनवणे, बी.डी. न्हावी, एच.एच. पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
■ शिक्षणाधिकार्‍यांच्या पत्रानंतर संस्थेने मॅनेजिंग कमिटीची मिटिंग बोलावून कारवाईचा ठराव केला. या घटनेबाबत चौकशी समिती नेमली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल. 
तापस पालच्या पत्नींनी मागितली माफी

Web Title: Suspension surrender on the three teachers with headmaster!