जळगावातील सम्राट कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 16:24 IST2018-02-06T16:21:43+5:302018-02-06T16:24:30+5:30

सम्राट कॉलनीतील रहिवाशी नीलेश भास्कर अहिरराव (वय ४०, मुळ रा.वाघळी, ता.चाळीसगाव) या तरुणाचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला.

Suspected death of youth in Jalgaon | जळगावातील सम्राट कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगावातील सम्राट कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

ठळक मुद्देविवाह समारंभातील जेवणानंतर सुरु झाला त्रासउपचारानंतर तब्बेत खालावल्याने झाला मृत्यूऔद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.६ : सम्राट कॉलनीतील रहिवाशी नीलेश भास्कर अहिरराव (वय ४०, मुळ रा.वाघळी, ता.चाळीसगाव) या तरुणाचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला.

नीलेश हा सोमवारी कासमवाडी परिसरात एका विवाह समारंभात गेला होता. तेथे जेवण केल्यानंतर सायंकाळी त्याला जुलाब व उलट्यांचा त्रास झाला. परिसरात एका खासगी डॉक्टरकडे उपचार केल्यानंतर त्याला घरी आणण्यात आले. मंगळवारी पुन्हा त्याची तब्येत खालावली. सकाळी ११.३० वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही.
दरम्यान, नीलेश हा अविवाहित होता. मिळेल ते काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. वडील भास्कर लक्ष्मण अहिरराव यांचे यापूर्वी निधन झाले आहे. तर मोठा भाऊ प्रवीण याचेही निधन झाले आहे. पश्चात आई कलाबाई, भावाची पत्नी व त्यांचे मुले असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suspected death of youth in Jalgaon