शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शेतजमीन विक्री करुन महिलेची फसवणूक करणारा संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 9:38 PM

शनिपेठ पोलिसांनी मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या ः बनावट दस्तावेज व खोट्या महिलेचा केला वापर

जळगाव : बनावट दस्तावेज तयार करुन तसेच खोटी महिला उभी करीत महिलेची शेतजमीन विक्री करणारा संशयित आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. या संशयित आरोपी जयकिसन भगवान पाटील रा. शनिपेठ याला सोमवारी मध्यरात्री मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली.गुजरातमधील आशा सुनील ढोलकिया (४५ ) यांच्या मालकीचे कंडारी शिवारात शेत आहे. संशयित प्रकाश रामचंद्र नेहकर याने आपल्या फायद्यासाठी या शेताचे बनावट कागदपत्र व उतारा तयार केला. तसेच त्या कागदपत्रांवर आशा ढोलकिया यांचे नाव लावून व बनावट महिला उभी करुन खरेदीखत तयार करीत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी केली होती. त्याचप्रमाणे या संशयित आरोपीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता कुणत्याही प्रकारचा नजराणा भरलेला नसून शासनाची फसवणूक केल्याची घटना ६ नोव्हेंबर २०११ रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ मार्च रोजी प्रकाश नेहकर याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य संशयित आरोपी प्रकाश नेहकर याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याला घरुन अटक केली होती.मध्यप्रदेशातून केली अटकगुन्हा दाखल झाल्यापासून दुसरा संशयीत आरोपी जयकिसन भगवान पाटील रा. शनिपेठ हा देखील फरार होता. जयकिसन हा मध्यप्रदेशात असल्याची माहिती पोहेकाँ रविंद्र सोनार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ संतोष खवले व सचिन वाघ यांना सोबत घेत मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील माकड खेडा तहसील तरसावंद येथून जयकिसन याला मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अजून एक संशयित आरोपी फरार असून पोलीस पथक त्याच्या मागावर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव