जिल्हा प्रशिक्षण समन्वयक म्हणून सुषमा कंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 22:01 IST2021-02-05T22:01:07+5:302021-02-05T22:01:25+5:30
जळगाव - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डतर्फे केसीई सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम ...

जिल्हा प्रशिक्षण समन्वयक म्हणून सुषमा कंची
जळगाव - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डतर्फे केसीई सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची जिल्हा प्रशिक्षण समन्वयक म्हणून निवड केली आहे.
सीबीएसई बोर्ड संबंधित ऍफिलिएशन झालेल्या २७ शाळांच्या संदर्भात प्रशिक्षणासंबंधी महत्त्वाच्या कामांचा त्या आढावा घेतील. त्यात आवश्यकतेनुसार बदल करून ती माहिती सीबीएसईच्या सेंटर ऑफ एक्सिलेंस सीओई यांच्याकड़े सुपुर्द करतील. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे अभिनंदन केले आहे.