प्रदेश तेली युवक महासंघावर सुनील चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:38+5:302021-07-30T04:18:38+5:30
येथील श्री मंगल कार्यालयात बैठक झाली. प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष श्यामकांत ईशी (शिरपूर) यांचा ...

प्रदेश तेली युवक महासंघावर सुनील चौधरी
येथील श्री मंगल कार्यालयात बैठक झाली. प्रदेश तेली महासंघ युवक आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष श्यामकांत ईशी (शिरपूर) यांचा धरणगाव तेली समाजातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनील पंढरीनाथ चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या युवक आघाडीच्या जळगाव ग्रामीण (पश्चिम विभाग) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. श्यामकांत ईशी व नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रमेश चौधरी, आत्माराम चौधरी, दीपक सखाराम चौधरी, रतीलाल चौधरी, राजू दगा चौधरी, विजू चौधरी, संजू चौधरी, रमेश सुकलाल चौधरी, मनोज चौधरी, सागर निंबा चौधरी, भटू चौधरी, बापू चौधरी, निर्मल चौधरी, मनोहर गोटू चौधरी, बालू चौधरी, किरण पोपट चौधरी, मोनू अनिल चौधरी, प्रदेश तेली महासंघ पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.