कंडारी येथील तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 16:10 IST2020-11-19T16:10:14+5:302020-11-19T16:10:25+5:30

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे विनोद भैय्यासाहेब सुर्वे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या ...

Suicide of a youth from Kandari | कंडारी येथील तरुणाची आत्महत्या

कंडारी येथील तरुणाची आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे विनोद भैय्यासाहेब सुर्वे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र नैराश्यातून त्याने जीवन संपविले असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
विनोद सुर्वे याच्या आई, वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच राहत होता. मिळेल ते काम करुन तो स्वत:चा चरीतार्थ चालवित होता. या परिसरात चुलतभाऊ निलेश सुर्वे हा देखील राहतो. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता विनोद शेकोटीवर आला. यानंतर पुन्हा घरात जावून झोपतो म्हणून घरी गेला. काही वेळाने विनोद खरोखर झोपला आहे का हे पाहण्यासाठी निलेश गेला, असता त्याने छताला वायरने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलीस पाटील कैलास पाटील यांच्या माध्यमातून नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील व प्रविण ढाके यांनी घटनास्थळ गाठले. चा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. पोलीस पाटील कैलास पाटील यांच्या खबरीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहेत.

Web Title: Suicide of a youth from Kandari