जळगावात नैराश्यातून महिलेची मेहरुण तलावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 20:14 IST2018-02-05T20:13:04+5:302018-02-05T20:14:59+5:30
पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली.

जळगावात नैराश्यातून महिलेची मेहरुण तलावात आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.५ : पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरुण तलाव परिसरात नागरिकांना सोमवारी सकाळी साडे सात वाजता तलावाकाठी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला कळविली. हवालदार भरत लिंगायत व अशोक पाटील यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा जागेवर पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.