जळगाव परिसरात अनोळखी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 19:59 IST2018-06-30T19:57:08+5:302018-06-30T19:59:57+5:30
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे हजरत शहा दर्ग्याजवळ नाल्याकाठी एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाने एका झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

जळगाव परिसरात अनोळखी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे हजरत शहा दर्ग्याजवळ नाल्याकाठी एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाने एका झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आव्हाणे गावातील काही तरुण नाल्याकाठी शौचास गेले असता त्यांना एका तरुणाने झाडाला गळफास घेतलेला आढळून आले. या तरुणाने फक्त अंडरवियर परिधान केलेली होती. गावातील मुलांनी हा प्रकार दर्ग्याचे सेवक गुलाम मोहम्मद मुजावर यांनी पोलीस पाटील चौधरी यांना कळविले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र बोरसे व भांडारकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.