कर्जबाजारी शेतकऱ्याची मांडवे येथे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:41 PM2020-03-05T12:41:34+5:302020-03-05T12:41:49+5:30

तोंडापूर, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक येथील गोपीचंद पुंडलिक जाधव (वय ५८) या शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास ...

Suicide at Loan Farmer's Mandwe | कर्जबाजारी शेतकऱ्याची मांडवे येथे आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची मांडवे येथे आत्महत्या

Next

तोंडापूर, ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक येथील गोपीचंद पुंडलिक जाधव (वय ५८) या शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ४ रोजी सकाळी ७:३० वाजता उघडकीस आली.
मांडवे बुद्रूक शिवारात गट नं.८८ मध्ये एकूण अडीच एकर शेती आहे. यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतातील धान्याचे नुकसान झाले.
दोन मुलींची लग्ने झाल्यावर मुलांच्या लग्नाला लागणारा खर्च व सावकारी कर्ज काढून शेतात झाले. या नुकसानीमुळे शेतातील निंबाच्या झाडाला फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

Web Title: Suicide at Loan Farmer's Mandwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.