गोंडखेल शिवारात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:05 IST2021-05-10T15:10:49+5:302021-05-10T17:05:07+5:30

सोनाळा, ता. जामनेर येथील पंचवीस वर्षीय तरूणाने गोंडखेल, ता. जामनेर शिवारातील स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Suicide by hanging of a youth in Gondkhed Shivara | गोंडखेल शिवारात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

गोंडखेल शिवारात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देपहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद.आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : सोनाळा, ता. जामनेर येथील पंचवीस वर्षीय तरूणाने गोंडखेल, ता. जामनेर शिवारातील स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. निलेश उर्फ भूषण सदाशिव पाटील असे युवकाचे नाव असून पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश उर्फ भुषण सदाशिव पाटील (२५, सोनाळा, ता. जामनेर) हा गोंडखेल शिवारातील स्वतः च्या शेतात शेती कामासाठी गेला होता. दुपारी बाराच्या सुमारास गळफास झाडाला लावल्याचे शेजारी ल शेतकऱ्यांना निदर्शनास आले, याची माहिती पोलिस पाटील संजय पाटील यांना मिळाली. घटनास्थळी सरपंच रघुनाथ पाटील, सुरेश पाटील, नाना पाटील व गावकरी दाखल झाले.

उपचारासाठी निलेशला ग्रामीण रूग्णालयात पहूर येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. रुग्णालयात जमाव मोठ्या प्रमाणावर जमल्यावर तातडीने पोलीस निरीक्षक राहूल खताळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, विनय सानप, गोपाळ माळी, जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, राम ढाकरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित झाले व त्यांनी जमावाला पांगविले.

अपहरणाचा गुन्हा

रविवारी रात्री सोनाळा येथील अल्पवयीन युवकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी संबधित युवकाविरूद्ध तक्रार दिल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत अल्पवयीन युवक हा अल्पवयीन मुलीला घेऊन मयत निलेश उर्फ भुषण सदाशिव पाटील याची दुचाकी घेऊन पसार झाल्याचे माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच संबधीत अल्पवयीन युवक व निलेश यांची दुचाकी नेण्याच्या कारणावरून दोघांमध्ये संभाषण झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांना हाती लागले आहे. त्यामुळे निलेशने भिती पोटी गळफास लावून आत्महत्या केली असेल का ? याची चौकशी पोलीस करीत असून संशय व्यक्त केला जात आहे. निलेश हा गरिब परिस्थितील युवक असून आई ,वडील, लहान भाऊ ,आजी परिवाराचा सांभाळ करणारा घरातील कर्ता मुलगा होता.

Web Title: Suicide by hanging of a youth in Gondkhed Shivara