शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

नाटकाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:25 PM

‘लोकमत’च्या ‘मंथन’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी....

गोष्ट तशी जुनी आहे. जुनी म्हणजे खूप जुनी आहे. मानव जेव्हा अदीम अवस्थेत होता त्या काळची. तो शिकार करून उदरनिर्वाह करीत होता. अग्नी त्याला निर्माण करता येत होता. झोपडी बांधायला तो शिकला होता.माणसाला समूहाने राहिले तर आपण सुरक्षित राहू याचे भान आले होते. भाषा जरी अस्तित्वात आली नव्हती तरी परस्परांश्ी संवाद करण्याची कला त्याने आत्मसात केली होती. अशा काळातली ही गोष्ट आहे.अशाच काळातल्या एका सकाळी त्या समूहातला एक तरुण शिकारीसाठी बाहेर पडला. जंगलात तो आला. सकाळपासून दुपारपर्यंत तो त्या जंगलात शिकार शोधत फिरला. पण शिकार काही मिळेना. संध्याकाळ झाली, श्ेवटी तो हताश होवून एका झाडाखाली बसला. सूर्य मावळतीकडे होता, हळूहळू अंधार पडू लागला होता, त्या तरुणाचा आता भुकेने जीव व्याकूळ झाला होता. तेवढ्यात त्याला सिंहाची डरकाळी ऐकू आली, तो सावध झाला. अचानक समोरच्या झुडपात हालचाल झाली. तो तरुण त्याच्या हातातले शस्त्र घेवून सज्ज झाला आणि प्रत्यक्ष सिंह त्याच्यासमोर आला. त्या सिंहाने त्या तरुणावर झेप घेतली. तरुण तसा सशक्त व धीराचा होता. तरुण व सिंह या दोघात तुंबळ युध्द झाले. अखेर त्या सिंहाची शिकार करण्यात तरुणाला यश् आले. त्या मृत सिंहाला खांद्यावर टाकून तो तरुण आपल्या वस्तीकडे निघाला. वस्तीवरची मंडळी चिंतेत पडली होती. सकाळचा गेलेला तो तरुण अद्याप कसा परत आला नाही म्हणून काळजीत होती. पण दुरून येत असलेला तरुण व त्याच्या खांद्यावरची श्किार पाहून त्यांनी जल्लोष केला. त्या तरुणाचे स्वागत केले. आणलेली शिकार त्यांनी ताब्यात घेवून तिच्यावर प्रक्रिय करून ती खाण्यायोग्य केली व सगळ्यांनी मिळून त्या शिकारीवर ताव मारला. आपली भूक शांत केली. भूक शांत झाल्यावर त्यांची डोकी चालायला लागली. अंधार पडू लागल्याने वस्तीच्या मधोमध शेकोटी पेटवली होती. बाजूला त्या शिकार केलेल्या सिंहाचे कातडे पडलेले ह ोते. ते कातडे पाहून त्यांच्या मनात विचार आला. या येवढ्याश पोराने हा भला मोठा सिंह मारलाच कसा? त्यांनी त्या तरुणाला विचारले पण त्याला ते काही सांगता येईना. शेवटी त्याला सुचले. त्याने ते कातडे त्याच्या मित्रास सिंहासारखे दिसेल असे पांघरून माझ्यावर त्याच्यासारखा माझ्यावर हल्ला कर असे सांगितले. त्या मित्राने ते कातडे पांघरले व तरुणावर सिंहासारखा हल्ला केला. त्या तरुणाने त्या सिंहाला कसे मारले हे करून दाखवले. त्या शेकोटी भोवती बसलेल्या सगळ्यांना ती शिकारीची गोष्ट उमजली व त्या तरुणाचे कौतुक केले जाऊ लागले.त्या शेकोटीभोवती जे काही घडले ते जगातले पहिले नाटक होय. तो तरुण व त्याचा मित्र हे त्या नाटकातील पहिले नट. त्या शेकोटीचा प्रकाश ही त्या नाटकाची पहिली प्रकाश् योजना, त्याने पांघरलेलं कातडं ही त्या नाटकाची पहिली वेशभूषा. त्या तरुणाला त्याने श्किार कश्ी केली हे सांगताना त्याने जे काही करून दाखवले ते पहिलं नाट्य होय तर त्या श्ोकोटी भोवती जमलेले लोक हे त्या नाट्याचे पहिले साक्षीदार अर्थात प्रेक्षक होय.अशा अभिव्यक्तीतून कलेचा जन्म होतो. नाटक म्हणजे दुसरं काय तर आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्याला नाट्यकलेच्या माध्यमातून सांगणे हा होय.सर्वसाधारण माणूस जे काही मनातले आहे ते दुसºयाला सांगण्याचा आपापल्या पध्दतीने प्रयत्न करीत असतो पण सर्वसाधारण माणसाच्या तुलनेत या कलावंतांची सर्वसामान्य माणसांपेक्षा व्यक्तता ही जास्त असते आणि म्हणून ते व्यक्त होण्यासाठी कलेचे माध्यम स्वीकारतात आणि म्हणूनच या अभिव्यक्तीमुळे या कलावंतांनी हे जग सुंदर करण्यास मोलाचा हातभार लावलेला आहे यात कोणतेही दुमत नाही.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव