मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 06:43 PM2018-11-03T18:43:08+5:302018-11-03T18:58:51+5:30

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अपव्यय थांबवावा. वेळोवेळी फुटणारी पाईपलाईन पूर्णपणे बदलावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Stop the OLA pipeline leakage at Hartale | मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना

मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरओडीएच्या पाईपलाईनची गळती थांबता थांबेना

Next
ठळक मुद्देनदीचे पाणी पुन्हा नदीतचदररोजच होते पाण्याची नासाडीसतत फुटणाºया पाईपलाईनमुळे कर्मचारीही वैतागले

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील ओडीएची पाईपलाईन गेल्या महिन्यांपासून ५० फूट अंतरावर दोन ठिकाणी फुटली आहे. जीर्ण झालेल्या या पाईपलाईनमुळे दररोज लाखो लीटर पाणी पुन्हा नदीतच वाहून जात आहे. मात्र ते उपयोगात येत नाही. कायमस्वरूपी नासाडी होणाऱ्या पाण्याचा अपव्यय थांबवावा. वेळोवेळी फुटणारी पाईपलाईन पूर्णपणे बदलावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
एकीकडे पाण्याची भीषण टंचाई व दुसरीकडे पाण्याची नासाडी, पाणी वाहत असल्याचे पाहून नागरिकांना धक्का बसत आहे. ओडीएच्या टाकीत पाणी न जाता मध्येच गळती होते. त्यावरील वेळ, वीज विनाकारण वाया जाते. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
नेहमीचाच प्रकार
पूर्णा नदी ते हरताळे गावालगत असलेल्या या पाईपलाईनचे महिना गणिक पाईपलाईन पुरवठा विभागाकडून दाखल घेतली जाते व तत्काळ दुरुस्ती केली जाते. इकडे गळती जोडली गेली की काही दिवसातच दुसरीकडे गळती लागते. हे आता नित्याचेच झाले आहे. यामुळे या विभागाचे कर्मचारीदेखील त्रस्त झाले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे ह्या पाईपलाईन गळतीचे ठिकाण नदी व पंपिंग हाऊसपासून रहदारीवरच आहे. त्वरित दखल घेऊन वाया जाणारे पाणी, वेळ, वीज थांबवावी, अशी आशा व्यक्त होत आहे.





 

Web Title: Stop the OLA pipeline leakage at Hartale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.