Stolen in a couple's house in Pune | पुण्याला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरी
पुण्याला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरी

जळगाव : वडीलांचे निधन झाल्यामुळे पुण्याला गेलेले संजय नारायण मालपुरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करित १ लाख रूपायांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सायंकाळी गायत्री नगरात उघडकीस आली आहे़ चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यत फेक लेले आढळून आले.
गायत्री नगरातील गायत्री मंदिराजवळ संजय नारायण मालपुरे कुटूंबीयांसह राहतात़ दरम्यान, त्यांचे वडील नारायण राजाराम मालपुरे यांचे पुण्यात निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तु कुटूंबीयांसह पुण्याला गेले. अंतिम विधी आटोपून रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले़
यावेळी चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून कपाटातील एक लाख रुपये रोख तीन तोळ्याची सोन्याची पोत, ३ ग्रॅमचे कानातले दागिने, ५ ग्रॅमची अंगठी आणि १० ग्रॅमची सोन्याची चैन असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार मालपुरे यांच्या पाहणीत दिसून आला़ संजय मालपुरे हे एमआयडीसीतील एका दालमिल कंपनीत कामाला आहे तर त्यांची पत्नी रत्ना संजय मालपुरे ह्या क्रीडा रसिक प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे


Web Title:  Stolen in a couple's house in Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.