पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी भारंबे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:40 IST2018-10-27T22:39:14+5:302018-10-27T22:40:36+5:30
यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना शुक्रवारी मुंबईत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी भारंबे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामविकास अधिकारी संजय तुळशीराम भारंबे यांना शुक्रवारी मुंबईत राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री तथा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भारंबे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. याप्रसंगी राज्यपाल सी.विद्यासागर राव, राज्यमंत्री, ग्रामविकासमंत्री दादाजी दगडू भुसे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माहीम (मुंबई)चे आमदार सदा सरवणकर, राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारंबे यांच्या कार्याबद्दल यावलचे आमदार हरीभाऊ जावळे, सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती उमाकांत पाटील, सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.