जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 23:44 IST2023-09-01T23:43:13+5:302023-09-01T23:44:32+5:30

या पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. 

State award announced to four teachers of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर 

जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्य पुरस्कार जाहीर 

विलास बारी
जळगाव : राज्य शासनातर्फे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. 

शिक्षक पुरस्कार मिळालेल्यांमध्ये डॉ. सीमा भास्कर सैंदाणे (लाड कूबाई माध्यमिक विद्यालय, भडगाव), कल्पना देविदास माळी (शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, परसाडे ता.यावल) डॉ.जगदीश लक्ष्मण पाटील. (जिल्हा परिषद शाळा, कंडारी, ता.जळगाव ) आणि  छगन पंढरीनाथ पाटील (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा जवखेडे, ता. अमळनेर) यांचा समावेश आहे.  प्रत्येकी दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Web Title: State award announced to four teachers of Jalgaon district