शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

वडिलांच्या उद्योगात पुत्राने उमटविली ‘छबी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:42 PM

-हितेंद्र काळुंखे जळगाव : कानळदा या गावात साधारण कुटुंबात जन्मलेले मधुसुधन राणे यांनी १९६२ साली मुंबईत आपल्या घरातच स्वकमाईच्या ...

-हितेंद्र काळुंखेजळगाव : कानळदा या गावात साधारण कुटुंबात जन्मलेले मधुसुधन राणे यांनी १९६२ साली मुंबईत आपल्या घरातच स्वकमाईच्या अवघ्या ५ हजार रुपयात सुरु केलेल्या व्यवसायाचा विस्तार काही वर्षातच त्यांनी कोट्यवधीच्या उलाढालीपर्यंत नेला. छबी इलेक्ट्रीकल्सच्या माध्यमातून बहरलेल्या या व्यवसायाचा डोलारा त्यांचे पुत्र छबीराज राणे हे समर्थपणे सांभाळत आहे.मधुसुधन राणे यांंनी १९५९ मध्ये सूरत इंजिनिअरींग कॉलेजमधून इलेक्ट्रीकल डिप्लोमा मध्ये गोल्ड मेडल मिळविले होते. या मेडल प्रमाणेच आयुष्यात त्यांची चमकदार कामगिरी ठरली. नोकरी करत असताना ५ हजार रुपये जमा करुन मुंबई येथे घरातच १९६२ साली ट्रान्सफार्मर बनविणे सुरु केले. व्यवसायात यश मिळत गेले आणि १९६९ मध्ये मुंबईतच मोठमोठ्या उद्योगात लागणाऱ्या बॅटरी चार्जरचे उत्पादन सुरु करण्यात आले. उद्योग बहरत गेला. यानंतर जळगावात आपल्या गावाकडे उद्योग सुरु करण्याची इच्छा मधुसुधन राणे यांच्या मनात बळावली. यानुसार १९७८ मध्ये जळगावातही युनिट सुरु करण्यात आले. मुलगा छबीराज यांच्या नावानेच मधुसुधन राणे यांनी सुरु केलेली ‘छबी ईलेक्ट्रीकल्स’ ही कंपनी प्रगतीच्या शिखरावर अल्पावधीतच पोहचली. दरम्यान पुणे येथे इलेक्ट्रीकल इंजिनीअरची पदवी घेतल्यावर छबीराज राणे यांनी देखील वडिलांसोबत काही प्रमाणात काम पाहण्यास १९८७ पासून सुरुवात केली.मधुसुधन राणे यांनी १९९४ मध्ये छबीराज राणे यांच्यावर मॅनेजींग डायरेक्टर ही महत्वाची जबाबदारी सोपविली. १९९९ मध्ये त्यांनी कंपनीला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून दिले. छबीराज यांनी २०१२ मध्ये ओमान येथेही निर्यात सुरु केली. कंपनीचा विस्तारही केला. वडील मधुसुधन राणे यांच्या निधनानंतर छबीराज हे पूर्ण कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहे.सामाजिक कार्यातही चमकउद्योगात भरारी घेत असताना मधुसुधन राणे यांनी सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवले होते. त्यांनी श्रीनिकेतन ट्रस्टच्या माध्यमातून अयोध्यानगरातील बालाजी मंदिर परिसरात उद्यानाची व सभागृहाची निर्मिती केली. यासह अनेक सामाजिक कार्यात सहभााग दिला. हेच काम छबीराज राणे हे देखील करीत आहेत.उद्योग क्षेत्रात मदत कार्य करणारी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ते जनरल सेक्रेटरी होते. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स उर्जा समितीचे ते अध्यक्ष असून भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करण्याचा त्यांचा मानस आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव