कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार

By विजय.सैतवाल | Updated: September 27, 2023 17:16 IST2023-09-27T17:15:49+5:302023-09-27T17:16:27+5:30

रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

someone cut the electric wire, the woman was stabbed with a knife | कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार

कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार

जळगाव : वीज पुरवठ्याची वायर कट झाल्याविषयी जाब विचारल्याच्या कारणावरून ३० वर्षीय महिलेसह दिराला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. महिलेच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. ही घटना समतानगरात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

समतानगरातील राणी सलीम शेख (३०) यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी राणी शेख यांचे दीर तन्वीर शेख हे घराबाहेर आले. त्यावेळी तेथे दोन ते तीन जण बसलेले होते. कुणीतरी विजेची वायर कट केली, असे तन्वीर शेख म्हणाले. त्याचा राग आल्याने बाहेर बसलेल्यांपैकी एका जणाने शिविगाळ करून मारहाण केली. त्यावेळी राणी सलीम शेख या मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता त्यांनादेखील मारहाण केली व चाकूसारखी वस्तू हातावर मारून दुखापत केली.

याप्रकरणी महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. नीलेश पाटील करीत आहेत.

Web Title: someone cut the electric wire, the woman was stabbed with a knife