अंगावर बर्फ पडल्याने चाळीसगाव येथील जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 12:01 IST2020-12-16T12:01:00+5:302020-12-16T12:01:40+5:30
जम्मू काश्मीरमध्ये अंगावर बर्फ पडल्याने अमित साहेबराव पाटील (निकम) या जवानाचा मृत्यू झाल्याची बुधवारी पहाटे घडली.

अंगावर बर्फ पडल्याने चाळीसगाव येथील जवानाचा मृत्यू
जळगाव - जम्मू काश्मीरमध्ये अंगावर बर्फ पडल्याने अमित साहेबराव पाटील (निकम)( ३३,रा.वाकडी ता.चाळीसगाव) या जवानाचा मृत्यू झाल्याची बुधवारी पहाटे घडली. गेल्या २० दिवसांत चाळीसगाव तालुक्याने दुसरा जवान गमावला आहे.
अमित यांची नोकरीची सुरुवात गांधी नगर येथून झाली. २१ जून२०१० पासून जम्मू काश्मीर मध्ये ते सेवा बजावत होते. १२ डिसेबंर २० रोजी अंगावर बर्फ पडल्याने ते जखमी झाले. उपचारदरम्यान त्यांना विरगती प्राप्त झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगा व मुलगी, दोन भाऊ, बहीण, असा परिवार आहे. वडील साहेबराव नाथाजी पाटील निकम हे शेतकरी आहेत. २६ नोव्हेंबर रोजी यश देशमुख ( चाळीसगाव ) हे जवान अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले होते.