शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या चरणी दरवळतो आठ टन अगरबत्तीचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:37 IST

अगरबत्तीची मागणी चारपटीने वाढली

जळगाव : लाडक्या बाप्पाच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्य असून वातावरण प्रसन्न करणाऱ्या अगरबत्तीचीही मागणी चारपटीने वाढली आहे. शहरात दररोज जवळपास आठ टन अगरबत्तीची विक्री होऊन आठ लाख रुपये किंमतीचा सुगंध या निमित्ताने घरोघरी व मंडळात दरवळत आहे.आनंददायी पर्व घेऊन येणाºया गणरायाच्या स्वागतासाठी विविध वस्तूंसह प्रसाद व पूजा साहित्याचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. घरोघरी तसेच वेगवेगळ््या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सकाळ-संध्याकाळ आवश्यकता असते ती अगरबत्तीची. त्यामुळे नेहमी मंदिरात व धार्मिक विधीसाठी भक्तीभावाने लावली जाण्याºया अथवा कोणतेही कार्यालय, दुकान या ठिकाणी वातावरण प्रसन्न करणाºया अगरबत्तीला गणेशोत्सवासाठी मागणी चांगलीच वाढली आहे.मागणी चारपटजळगाव शहरात एरव्ही दररोज दोन टन अगरबत्तीची विक्री होते. मात्र गणेशोत्सवाच्या काळात ही विक्री आठ टनावर पोहचली आहे. नेहमी केवळ सकाळ-संध्याकाळ घरी, मंदिरात लावली जाणारी अगरबत्ती गणेशोत्सवात मंडळाच्या ठिकाणीही लावली जाते. त्यामुळे या मागणीत जास्त भर पडत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.विविध प्रकार व आकारातील अगरबत्तीबाजारात सध्या नेहमीच्या अगरबत्तीसोबतच १६ इंची, १९ इंची, दोन फुटी, ३ फुटी अगरबत्तीदेखील आलेल्या आहेत. सोबतच ‘गोल्डन’ अगरबत्तीची विक्री होत आहे. मोठ्या आकारातील ही अगरबत्ती एकवेळा लावली की ती साधारण दिवसभर चालते.गुजरातच्या अगरबत्तीला वाढली मागणीबंगलुरू येथून पूर्वी जळगावात जास्त प्रमाणात अगरबत्ती येत असे. मात्र दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही अनेक शहरात अगरबत्तीचे उत्पादन होऊ लागल्याने महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक या शहरातून तसेच गुजरात, मध्यप्रदेशातील उज्जैन येथूनही अगरबत्ती जळगावात येते. यात गुजरातच्या अगरबत्तीची जास्त विक्री होते, असेही विक्रेत्यांनी सांगितले.दोन टन कापूरची ज्योतअगरबत्तीसोबतच गणेशोत्सवासाठी दररोज दोन टन कापूरची विक्री होत आहे. सध्या एक हजार ३०० रुपये प्रती किलो असा कापूरचा होलसेल भाव असून किरकोळ बाजारात तो १६०० ते १७०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे भाव स्थिर आहे, मात्र तीन वर्षांपूर्वी कापूरचे दर ४०० ते ४५० रुपये प्रती किलो होते. त्यावर जीएसटी लागल्यानंतर त्याचे भाव वाढतच गेले व आता हे भाव तीन पट झाले आहेत.गणेशोत्सवाच्या काळात अगरबत्तीची मागणी चारपटीने वाढली आहे. तसेच कापूरची विक्री वाढली आहे.- ललित बरडिया, अगरबत्ती कापूर होलसेल विक्रेते.

टॅग्स :Jalgaonजळगाव