शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओंसह सहा जणांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

बीडीओंसह सहा जणांवर खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्हा अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर (जि. जळगाव) ...

बीडीओंसह सहा जणांवर

खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर (जि. जळगाव) : मागासवर्गीय महिला सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमळनेरचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मठगव्हाण येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी याबाबत फिर्याद दिली. त्या २२ फेब्रुवारी २०१८ पासून सरपंचपदाचा कारभार पाहत होत्या. त्यावेळी बीडीओंनी वैयक्तिक शौचालय बांधकाम कामाबद्दल वर्गणीच्या नावाखाली एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच ग्रामसेवकपद रिक्त असल्याने त्याबाबत तक्रार केली असता त्यांनी अश्लील व जातिवाचक शब्द वापरले. त्यामुळे वाघ यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.

मात्र सभापतींनी राजीनामा नामंजूर करून गटविकास अधिकारी यांची माफी मागायला लावली. यानंतर बीडीओंनी सदस्यांना हाताशी धरून चौकशी सुरू केली. त्यासाठी दोन विस्तार अधिकारी नेमण्यात आले. या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची खंडणी मागितली. नंतर आपणास अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठविला. यानंतर सुनावणीसाठी बोलावले असता शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालय बांधकामाबाबत ५ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला. त्यावेळी आपण पदावर नव्हतो, असे वाघ यांचे म्हणणे आहे.