- विजयकुमार सैतवाल जळगाव : सोने चांदीच्या भावात वाढ सुरूच असून सोमवारी (२६ जानेवारी) चांदीच्या भावात १० हजार रुपयांची वाढ होऊन तीन लाख ५५ हजार रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ६० हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे.
२२ जानेवारी रोजी २३ हजार रुपयांची घसरण होऊन चांदी तीन लाख सात हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर २३ जानेवारीपासून चांदीच्या भावात सतत मोठी वाढ सुरू आहे. २३ रोजी २० हजार, २४ रोजी आठ हजार, २५ रोजी १० हजार व २६ रोजी पुन्हा १० हजार अशी भाववाढ चांदीत झाली आहे. त्यामुळे चांदीने साडेतीन लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.
सात दिवसात ५४ हजार रुपयांची वाढ
सातच दिवसात चांदीमध्ये ५४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १९ जानेवारी रोजी तीन लाख एक हजार रुपये भाव असलेली चांदी २६ जानेवारीपर्यंत तीन लाख ५५ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
Web Summary : Silver prices surged to ₹3.55 lakh, a ₹10,000 increase on Monday. Gold rose by ₹400 to ₹1,60,400. In seven days, silver jumped ₹54,000 from ₹3.01 lakh.
Web Summary : चांदी की कीमतें बढ़कर ₹3.55 लाख हो गईं, जो सोमवार को ₹10,000 की वृद्धि है। सोना ₹400 बढ़कर ₹1,60,400 पर पहुंच गया। सात दिनों में, चांदी ₹54,000 बढ़कर ₹3.01 लाख हो गई।