शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी अल्प मतदान

By admin | Updated: March 20, 2017 00:47 IST

वढोदा : अवघ्या 45़38 टक्के महिलांचा सहभाग

मुक्ताईनगर : तालुक्यातील वढोदा येथे दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला होता. यासाठी 19 रोजी घेण्यात आलेल्या मतदानात गावातील फक्त 45.38 टक्के महिलांनी सहभाग घेतला. अपेक्षित मतदान न झाल्याने  दारूची बाटली आडवी पाडण्यात महिलांना अपयश आले आहे.  वढोदा येथे दारूबंदीसाठी 23 ऑक्टोबर 2016 रोजी महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करून एक हजार 245 महिलांनी दारूबंदीचा ठराव पारित केला होता आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना असलेले दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ अगदी बॅण्ड लावून देशभक्तीपर गीतांच्या तालावर दारूबंदीसाठी जनजागृती येथे करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने निवेदनावरील सह्यांची पडताळणी केली होती. त्या वेळी  याच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद  नोंदविला होता. त्या वेळी एक हजार 245 महिला अर्थात 57.59 टक्के महिलांचे दारूबंदीला  समर्थन असल्याचे प्रत्यक्ष स्वाक्षरी पडताळणीत सिद्ध झाले होते.  तसा अहवाल जिल्हाधिका:यांना सादर ही करण्यात आला. यावर वढोदा येथे दारूबंदीसाठी मतदान घेण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी काढले.  19 मार्च रोजी झालेल्या मतदानात मतदार यादीतील 2238 मतदानापैकी आडव्या बाटलीला 858, दारू सुरू ठेवण्यास उभ्या बाटलीवर 74 तर 83 मते अवैध पडली.  रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान येथे मतदान झाले. चार वाजता मतमोजणी पार पडली. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सांगितले की, मतमोजणी अहवाल जिल्हाधिका:यांकडे पाठविला जाईल त्यानंतरच येथे दारू दुकान सुरू की बंद ठेवावे हा निर्णय येईल. दरम्यान, दारूबंदीसाठी आवश्यक मतदान झाले नाही.  52 टक्क्यांच्या आत झालेले मतदान पाहता  येथे महिला हरल्याचे व बाटली जिंकल्याचे चित्र आहे.