शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक..रेल्वेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचार न मिळाल्याने महिलेला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

मोतीलाल सांखला हे पत्नी मीना सांखला व मुलगी रीना जैन यांना सोबत घेऊन सुरतहून मंगळवारी रात्री अकरा वाजता गाडी ...

मोतीलाल सांखला हे पत्नी मीना सांखला व मुलगी रीना जैन यांना सोबत घेऊन सुरतहून मंगळवारी रात्री अकरा वाजता गाडी क्रमांक(०६५०१) ने बंगळुरूला जाण्यासाठी निघाले. प्रवासात मीना यांना कुठलाही त्रास नव्हता. मात्र, प्रवासात मध्यरात्री मीना सांखला यांना अचानक अस्थमाचा त्रास जाणवू लागला. मीना यांना अस्थमाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यावर पती मोतीलाल सांखला व मुलगी रीना जैन यांनी तातडीने गाडीतील तिकीट निरीक्षकांकडे धाव घेऊन तात्काळ आरोग्य उपचाराबाबत व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच गाडीत कुणी डॉक्टर आहे का, याचाही शोध घेतला. मुलगी रीनाने आईला उपचार मिळण्यासाठी मोठ-मोठ्याने आरडाओरडही केली. मात्र, रेल्वेकडून उपचाराची कुठलीही व्यवस्था न करण्यात आल्याने मीना यांची गाडीमध्येच प्राणज्योत मालवली.

इन्फो :

रेल्वेच्या कारभारावर संताप

मुलगी रीना यांना आईची बिघडलेली तब्येत बघवत नसल्यामुळे त्यांनी तिकीट निरीक्षकांकडे अनेकवेळा विनंती केली. इतकेच नव्हे, तर संपूर्ण गाडीत फिरुन डॉक्टर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील आईला उपचार न मिळाल्याने रीना यांनी तिकीट निरीक्षकांवर चांगलांच संताप व्यक्त केला. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेकडे कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आईचा मृतदेह पाहून प्रचंड आक्रोश केला. मुलीचा आक्रोश पाहून इतर प्रवाशांनादेखील अश्रू अनावर झाले होते.

इन्फो :

विमानाने नेला आईचा मृतदेह गावी

गाडीतच आईचे प्राण गेल्यामुळे पती मोतीलाल सांखला यांनी जळगावला मृतदेह उतरविला आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर मोतीलाल सांखला यांनी मुंबईहून खाजगी विमान मागविले. त्यानंतर विमानाने मयत मीना सांखला यांना बंगळुरू येथे नेले.

इन्फो :

या घटनेची डीआरएम यांनाही माहिती नाही :

या प्रकाराबाबत भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यांशी `लोकमत ` प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कुठलीही माहिती नसून, तक्रार आली नसल्याचे उत्तर दिले. तसेच याबाबत सिनिअर डीसीएम युवराज पाटील यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले. यावर युवराज पाटील यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत जळगाव स्टेशनचे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल यांनी या महिलेचा गाडीत जीव गेला नसून, जळगाव स्टेशनवरुन तात्काळ रुग्णालयात उपाचारासाठी नेल्याचा दावा केला आहे. तर रेल्वे लोहमार्गाचे पोलीस हवालदार रामराव इंगळे यांनी या महिलेचा गाडीतच मृत्यू झाला असल्याचे `लोकमत`ला सांगितले.