धक्कादायक : जळगावात जागा मालकाने जाळल्या मजुरांच्या झोपड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 13:27 IST2018-04-15T13:27:30+5:302018-04-15T13:27:30+5:30

संसाराची राखरांगोळी

Shocking: The slum dwellers burned by the landlord in Jalgaon | धक्कादायक : जळगावात जागा मालकाने जाळल्या मजुरांच्या झोपड्या

धक्कादायक : जळगावात जागा मालकाने जाळल्या मजुरांच्या झोपड्या

ठळक मुद्देदीड लाख रुपये जळून खाकदोघांच्या झोपड्या जळून खाक

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १५ - शहरातील मोहाडी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला झोपट्या टाकून राहत असलेल्या मजुरांच्या झोपड्यांना जागा मालकाने आग लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये दोघांच्या संसाराची राखरांगोळी झाली असून अग्नीशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली.
मोहाडी रस्त्यावर मोलमजुरी करणारे काही मजूर झोपडी टाकून राहतात. रविवारी सकाळी या ठिकाणी संबंधित जागा मालकाने मजुरांच्या या झोपड्यांना आग लावून दिली. यामध्ये दोघांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे बकऱ्या विकून आलेले दीड लाख रुपयेदेखील या आगीत जळून खाक झाले.
आग लागल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. त्या वेळी तत्काळ अग्नीशमन दलास कळविण्यात आले व ही बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Shocking: The slum dwellers burned by the landlord in Jalgaon