धक्कादायक! मुलाच्या लग्नाच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 16:41 IST2018-05-01T16:41:18+5:302018-05-01T16:41:18+5:30

प्रवीण सखाराम पावणकर (५१, रा. हातेड खु, ता. चोपडा) यांचे हृदयविकाराने 1 मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेदरम्यान मृत्यू झाला. 1 मे रोजी त्यांच्या मुलाचे विनय याचे लग्न हातेड येथेच होते.

Shocking Father's death on the child's wedding day | धक्कादायक! मुलाच्या लग्नाच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू

धक्कादायक! मुलाच्या लग्नाच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू

जळगाव : प्रवीण सखाराम पावणकर (५१, रा. हातेड खु, ता. चोपडा) यांचे हृदयविकाराने 1 मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेदरम्यान मृत्यू झाला. 1 मे रोजी त्यांच्या मुलाचे विनय याचे लग्न हातेड येथेच होते. मुलगी आडगाव-कासोदा ता. एरंडोल येथील उखा कौतिक अहिरे यांच्या रुपाली हिच्याशी विवाह हातेड खु येथे दुपारी साडेबारा वाजता होणार होता. मात्र मुलाच्या लग्नाच्या दिवशीच काळाने झडप घातली आणि पहाटे वडिलांचा मृत्यू झाला. 30 एप्रिल रोजी सायंकाळी विनय व रुपाली या दोघांना हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदांत पार पडला आणि रात्री उशिरापर्यंत गाण्यांवर पावणकर यांच्यासह सर्व नातेवाईकांनी नृत्यही केले. मात्र प्रवीण पावणकर यांचा रात्री १२ वाजेनंतर झोपेतच मृत्यू झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

Web Title: Shocking Father's death on the child's wedding day

टॅग्स :Deathमृत्यू