धक्कादायक! वृद्ध महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लांबवले, ५० हजाराची रक्कम घेऊन चोरटा पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:59 IST2022-12-30T15:58:35+5:302022-12-30T15:59:23+5:30
Crime News : ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिचे कान कापले आणि कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजाराची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रेल ता. धरणगाव येथे गुरुवारी रात्री घडली.

धक्कादायक! वृद्ध महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लांबवले, ५० हजाराची रक्कम घेऊन चोरटा पसार
- भगीरथ माळी
जळगाव - ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिचे कान कापले आणि कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजाराची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रेल ता. धरणगाव येथे गुरुवारी रात्री घडली.
विमलबाई श्रीराम पाटील ( ७०, रा. रेल ता. धरणगाव ) ह्या गुरुवारी रात्री पत्री शेडमध्ये एकट्या झोपल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत त्यांना मारहाण केली आणि कान कापून कानातील सोन्याचे दागिने तसेच घरातील ५० हजाराची रक्कम घेऊन चोरटा पसार झाला.
याबाबत निलेश मच्छिंद्र पाटील (रा. पिंप्री ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.