शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

By अमित महाबळ | Updated: June 20, 2025 14:01 IST2025-06-20T14:00:13+5:302025-06-20T14:01:11+5:30

Jalgaon News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या मार्गावरील पिंप्री गावात हे आंदोलन करण्यात आले.

Sharad Pawar group's agitation for complete loan waiver of farmers; Black flags shown to Chief Minister in Jalgaon | शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

-अमित महाबळ, जळगाव 
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शुक्रवारी (दि.२०), सकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या मार्गावरील पिंप्री गावात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, नुकसानग्रस्तांना सुधारित जीआर काढून हेक्टरी ४ हजार रुपये मदत द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी मरत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात कल्पिता पाटील, बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पाटील, संजय पाटील, हितेंद्र पाटील, अमोल हरपे, रियाज देशमुख आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Sharad Pawar group's agitation for complete loan waiver of farmers; Black flags shown to Chief Minister in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.