पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील नाट्य सेवा पुरस्काराने शंभू पाटील सन्मानित
By विलास बारी | Updated: August 31, 2023 21:38 IST2023-08-31T21:38:14+5:302023-08-31T21:38:30+5:30
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती

पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील नाट्य सेवा पुरस्काराने शंभू पाटील सन्मानित
जळगाव : पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील नाट्य सेवा पुरस्कार यंदा जळगाव येथील ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे-पाटील आणि इतर अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या वर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे नाट्य सेवा पुरस्कार शंभू पाटील यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती दिनी करण्यात आले.
परिवर्तन जळगाव ही केवळ नाट्यसंस्था नाही तर तो एक परिवार आहे. यामुळे हा पुरस्कार मला मिळाला असला तरी तो पुरस्कार माझ्या परिवर्तन परिवाराचा असल्याची भावना शंभू पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केली.